पत्नीपासून दूर अर्जुन रामपाल घेऊ शकतो घटस्फोट
ऋतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझैनमुळे दोघांच्या नात्यात कडवट आल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई : अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचा बातम्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. ऋतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझैनमुळे दोघांच्या नात्यात कडवट आल्याचे म्हटले जात आहे. अर्जुन आणि मेहर आता एकत्र राहत नाहीत. सुझैन, अर्जुन आणि मेहर याआधी खूप चांगले मित्र होते. पण वेळेसोबतच सुझैन आणि अर्जुनमध्ये जवळीक वाढत गेली आणि मेहरच्या नात्यात वितुष्ट आलं. ऋतिक आणि सुझैनच्या घटस्फोटासही हेच कारण असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. 'स्पॉटबॉय' मध्ये आलेल्या वृत्तानुसार, अर्जुन घर सोडून गेला असून सध्या एकटा राहतोय. गेल्या वर्षभरात त्याच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. नुकताच तो आपल्या मुलींसोबत सिनेमा पाहण्यासाठी गेल्याचे फोटो इंस्टाग्रामवर पाहायला मिळाले. या फोटोंमध्ये त्याची पत्नी कुठे दिसली नाही.
सुपरमॉडेल होती मेहर
मेहर जेसिया भारताच्या सुपर मॉडेल खिताब मिळविणाऱ्यांपैकी एक आहे. याशिवाय तिला सर्वजण यशस्वी मॉडेल आणि अर्जुनची पत्नी म्हणून जास्त ओळखतात. फेमिना मिस इंडिया बनल्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरूवात केली होती. करियरच्या उभारीतच तिला आंतरराष्ट्रीय मेकअपर ब्रॅण्ड लॅनकमचा चेहरा बनण्याची संधी मिळाली. त्यावेळी इसाबेला रॉसेलिनी हा चेहरा होती. पण आपल्या घराला प्राधान्य देत ही ऑफर नाकारली. त्यानंतर काही वर्षांनी मॉडेलिंग सोडून संसारात बिझी झाली. अर्जुनसोबतच्या लग्नाला आता १९ वर्षे झाली असून त्यांना २ मुली आहेत. सध्या ती अनेक फॅशन शो कोरियोग्राफ करते तसेच पतीच्या बिझनेसमध्येही हातभार लावते. अर्जुन रामपालचे दिल्ली आणि मुंबईत फाइव्ह स्टार रेस्टोरंट आहेत.