मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल याच्या आगामी ‘डॅडी’ सिनेमातील ‘डान्स डान्स’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. याआधी कुख्यात गुंड अरूण गवळीवर आधारित या सिनेमाच्या ट्रेलरला जोरदार प्रतिसाद मिळाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता हे गाणंही सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. या गाण्यातून अरूण वेगळाचा कधीही न पाहिलेला लूक बघायला मिळतो. 


‘डॅडी’ सिनेमातील हे गाणं रेट्रो स्टाईलने शूट करण्यात आलं आहे. त्यामुळे या गाण्याच्या निमित्तने मिथुन चक्रवर्ती आणि बप्पी दा यांची आठवण येते. ‘जिन्दगी मेरी डान्स डान्स’ हे गाणं जुन्या काळात घेऊन जाणारं आहे. कारण यात त्या काळातील रेट्रो लूक देण्यात आला आहे. 


साऊथ मुंबईच्या एका हॉटेलमधील हा सीन आहे. स्टेजवर दोन कलाकार सोनेरी कपड्यांमध्ये डान्स करत आहेत. त्यात शांत चेह-याने अर्जुन रामपालची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. या सिनेमातून गुंड अरूण गवळी याच्या जीवनावर आधारित असून यातून त्याच जगणं बघायला मिळणार आहे. तरूण असताना त्याचा काय जलवा होता हे या गाण्यातूनही अनुभवता येतं. 



अर्जुन रामपाल हा अरूण गवळीच्या भूमिकेत तंतोतंत फिट बसला आहे. त्याच्या या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं आहे. आता हा सिनेमा रिलीज होण्याची प्रेक्षक वाट बघत आहेत. मात्र या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील रिलीज डेट काय असेल हे स्पष्ट करण्यात आलेले नाहीये.