मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) च्या संकटात आणखी वाढ झाली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने अर्जुनच्या बहिणीला समन्स पाठवलं आहे. एनसीबीने अर्जुन रामपालची बहिण कोमल (Arjuns Sister Komal) ला समन्स पाठवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीकडून चौकशी आज होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन रामपालची याआधी दोन वेळा चौकशी झाली आहे. अर्जुनच्या घरी छाप्याच्या वेळी प्रतिबंधित औषधं सापडली होती. याआधी एनसीबीने अर्जुनच्या गर्लफ्रेंडचीही चौकशी करण्यात आली होती. या अगोदर NCB ने अर्जुन रामपालची अनेकदा चौकशी झाली आहे. १६ डिसेंबर रोजी अर्जुन रामपालला चौकशीकरता बोलावलं होतं. त्यानंतर २२ डिसेंबरपर्यंत अर्जुनने मुदत वाढवून मागितली होती. २१ डिसेंबरला अर्जुन एनसीबीसमोर चौकशीसाठी उभा राहिली.



NCBकडून आतापर्यंत अभिनेता अर्जुन रामपालची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात NCBने अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला होता. त्यावेळी अर्जुन रामपालच्या घरी NCBच्या अधिकाऱ्यांना NDPCअॅक्टनुसार प्रतिबंध असलेली औषधं मिळाली होती. अर्जुनने आपल्या एका नातेवाईकामार्फत बेकायदेशीरपणे ही औषधं घेतली होती. या औषधांसाठी ज्या प्रिस्क्रिप्शनचा वापर करण्यात आला होता ते एक्सपायर झालं होतं. 



त्याआधी एनसीबीने गॅब्रीएलाच्या भावाला लोणावळा येथून अटक केली होती. त्याच्याकडूनही काही प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केले होते. अमली पदार्थाचे सेवन, अमली पदार्थ विक्रेत्यांशी संपर्क आणि बॉलीवूडशी संबंधित व्यक्तींना अमली पदार्थाचा पुरवठा असा आरोप एनसीबीने त्याच्यावर ठेवला होता.