मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. खुद्द मलायका आणि अर्जुनने त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. दोघे अनेक कार्यक्रमांमध्ये  आणि पार्ट्यांमध्ये  एकत्र असतात. शिवाय व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत दोघे एकमेकांना वेळ देतात. एवढंच नाही तर सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी दोघे परदेशात जातात. दोघे एकमेंकांप्रती प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता देखील अर्जुने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. अर्जुनने शेअर केलेला फोटो मलायकाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. सध्या अर्जुनची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुनने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'वाढदिवसाच्या दिवशी जेवताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. गेल्या वर्षी मी किती निराश, हताश आणि थकलेला असयचो. पण आज माझ्यात दृढ संकल्प, ऊर्जा आहे. आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगाचा मी  सामना करू शकतो. मी त्या सर्वांचा आभारी आहे, ज्यांनी मला या मार्गावर आणण्यास मदत केली.'


पुढे अर्जुन म्हणाला, 'सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला. माझं समर्थन केलं, माझी काळजी घेतली. माझे मित्र, कुटुंब, फॅन्स अनेक जण माझ्या पाठीशी भक्कम उभे राहिले. सर्वांचे अत्यंत आभार.' पोस्ट करताना अर्जुन फोटोसाठी मलायकाला कॅप्शन ठेवण्यास विसरला नाही. मलायकाचं कौतुक करत तो म्हणाला, 'तुच मला सुंदर बनवते...' सध्या अर्जुनची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.