Bigg Boss OTT 3 च्या घरातून दोन मोठ्या खेळाडूंना बाहेर काढण्यात आलं आहे. या शोमधून अरमान मलिक आणि लवकेश कटारिया यांना ग्रँड फिनालेपूर्वी अनिल कपूरच्या शोमधून बाहेर काढण्यात आलं आहे. बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात आपल्या दोन पत्नींसह प्रवेश केलेल्या अरमान मलिकला बिग बॉसने संपूर्ण सीझनसाठी नामांकित केले होते. मात्र, या आठवड्यात, अरमान मलिकसह, लवकेश कटारिया, सना मकबूल आणि सई केतन राव यांनाही  बिग बॉस OTT 3 च्या घरातून बाहेर काढण्यासाठी नामांकन देण्यात आले होते. यावेळी बिग बॉसच्या प्रेक्षकांनी सांगितले होते की, यावेळी सई केतन राव बिग बॉसच्या घरातून बाहेर जाऊ शकतो. मात्र, सई केतन नाही तर लवकेश कटारिया आणि अरमान बिग बॉसच्या घरातून बाहेर फेकले गेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकेश आणि अरमानला का बाहेर काढले? 


लवकेश कटारिया आणि अरमानला प्रेक्षकांकडून मिळालेल्या मतांमुळे नाही तर बिग बॉस शोमधील काही टास्कमुळे बाहेर काढावे लागले आहे. या टास्कमध्ये बाहेरची व्यक्ती असलेल्या सनाला ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. पण हे टास्क काय आहे. त्यासाठी तुम्हाला बिग बॉस ओटीटी 3 च्या नवीन पर्वाची वाट पाहावी लागेल. अरमान आणि लवकेश बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर, बिग बॉस ओटीटी 3 ला त्याचे टॉप 5 फायनलिस्ट सापडले आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अरमानची पत्नी कृतिकाला बसला धक्का


सध्या बिग बॉस ओटीटी 3 मध्ये ट्रॉफीसाठी रणवीर शौरी, सना मकबूल, कृतिका मलिक, सई केतन राव आणि रॅपर नाझी यांच्यामध्ये अंतिम लढत पाहायला मिळणार आहे. या 5 स्पर्धकांपैकी, ज्याला लोकांकडून सर्वाधिक मते मिळतील त्याला बिग बॉसचा विजेता घोषित केलं जाणार आहे. सध्या अरमान मलिकच्या जाण्याने त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिकला मोठा धक्का बसला आहे. बिग बॉसच्या संपूर्ण सीझनमध्ये अरमानचा संपूर्ण परफॉर्म पाहता तो या शोच्या टॉप 5 फायनल लिस्टमध्ये त्याचा समावेश होईल असा अंदाज बिग बॉसच्या प्रेक्षकांनी बांधला होता. 


कोण जिंकणार बिग बॉस ओटीटी 3 ची ट्रॉफी?


अरमानसोबतच लवकेश कटारियालाही बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आलं आहे. सोशल मीडियावर त्याला मिळत असलेला पाठिंबा पाहता यावेळी फक्त लवकेश बिग बॉस ओटीटी 3 ची ट्रॉफी जिंकणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण ग्रँड फिनालेपूर्वी बिग बॉसने त्याला शोमधून काढून टाकले. आता उर्वरित 5 स्पर्धकांपैकी कोण बिग बॉस OTT 3 चा सीझन जिंकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.