मुंबई : झी मराठीवरील 'लाडाची मी लेक गं' मालिकेत डॉक्टरांची प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता आरोह वेलणकर सध्या आपल्या कामामुळे चर्चेत आहे. तो कायमच सोशल मीडियावर पोस्ट टाकत असतो. पण सध्या त्याने आपली 'Good News' चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोहने नुकतीच आपल्या सोशल मीडियावर दिवाळीनिमित्त खास फोटो शेअर केला आहे. आरोहची पत्नी अंकिता शिंगवी २०२१ मध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. आरोहचा नुकताच वाढदिवस देखील झाला आणि आता दिवाळीला ही गोड बातमी यामुळे तो अतिशय आनंदी आहे. 



आरोहने इंस्टाग्रामवर आपली पत्नी अंकिताचा फोटो शेअर करत म्हटलंय,'ही दिवाळी खास आहे.' आरोहने सोशल मीडियावर लाईव्ह आला आणि त्याने आपण लवकरच पालक होणार असल्याचं म्हटलंय.



आमच्या लवकरच पाहुणा येणार आहे. अंकिता वाढदिवसाला इतकं सुंदर गिफ्ट दिलंय त्यासाठी मनापासून आभार.


'रेगे' सिनेमामुळे आरोह चर्चेत आला. त्याने आपली मैत्रिण अंकिता शिंगवीसोबत महाबळेश्वरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं. आरोह आणि अंकिताने महाराष्ट्रीयन आणि मारवाडी पद्धतीने लग्न केलं. आरोहच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो 'सौरभ' ही व्यक्तीरेखा 'लाडाची मी लेकं गं' या मालिकेत साकारत आहे.