6 बेडरुम, स्विमिंग पूल, लिफ्ट अन् रुफटॉप बार; रिंकू सिंगचं 3.5 कोटींचा आलिशान बंगला आतून कसा दिसतो? पाहा फोटो

रिंकूने अलीगढच्या ओझोन सिटीमध्ये असलेल्या गोल्डन इस्टेटमध्ये आलिशान बंगला खरेदी केला आहे. 500 चौरस फुटांमध्ये वसलेलं या घराची किंमत 3.5 कोटी रुपये आहे.    

| Nov 14, 2024, 19:32 PM IST

रिंकूने अलीगढच्या ओझोन सिटीमध्ये असलेल्या गोल्डन इस्टेटमध्ये आलिशान बंगला खरेदी केला आहे. 500 चौरस फुटांमध्ये वसलेलं या घराची किंमत 3.5 कोटी रुपये आहे.

 

1/14

भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगने आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सच्या यश दयालला सलग 5 षटकार लगावल्यानंतर त्याचं आयुष्यच बदललं.  (Photos: Youtube Grab/ Ozone City)  

2/14

नुकतंच कोलकाता नाईट रायडर्सने रिंकू सिंगला 13 कोटीत रिटेन केलं आहे.   

3/14

सलग पाच षटकार लगावणाऱ्या रिंकू सिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली असून कोलकाता नाईट रायडर्ससाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे.   

4/14

दरम्यान नुकतंच रिंकूने अलीगढच्या ओझोन सिटीमध्ये असलेल्या गोल्डन इस्टेटमध्ये आलिशान बंगला खरेदी केला आहे.   

5/14

500 चौरस फुटांमध्ये वसलेलं या घराची किंमत 3.5 कोटी रुपये आहे.  

6/14

आता, रिंकूने स्वतः आपलं घर दाखवलं आहे. ज्यामध्ये रूफटॉप बार, खासगी पूल आणि एक खास जागा आहे जिथे त्याने ते पाच षटकार ठोकलेली बॅट ठेवण्यात आली आहे.  

7/14

रिंकूच्या घऱात एक प्रायव्हेट लिफ्टदेखील आहे.   

8/14

‘माझं स्वत:चं एक घर असावं असं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण झालं असून देवानेच यासाठी हातभार लावला आहे,’ अशा भावना रिंकूने व्यक्त केल्या आहेत.   

9/14

रिंकू सिंगला मिळालेली प्रसिद्धी, पैसा एका रात्रीत आलेला नाही. यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले असून, हालाखीचे दिवसही पाहिले आहेत.   

10/14

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या रिंकू सिंगला सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. या आव्हानांना न जुमानता, त्याने क्रिकेटची आवड जोपसली आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा देण्याचा त्याचा दृढनिश्चय केला.   

11/14

आपली निर्भय फलंदाजी आणि अपवादात्मक फिनिशिंग क्षमतेसाठी ओळखला जाणारा रिंकू सिंग आज कोलकाता नाईट रायडर्साठी महत्त्वाचा खेळाडू बनला आहे.  

12/14

2023 च्या आयपीएल हंगामात, गुजरात टायटन्स विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात सलग पाच षटकार लागल्याने त्याला देशासह, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. या अतुलनीय कामगिरीमुळे केवळ KKR मधील त्याचे स्थान मजबूत झालं नाही तर देशभरातील क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक आणि आदरही मिळाला.  

13/14

कोलकाताने रिटेन केल्यानंतर रिंकू सिंगने आपलं स्वप्न पूर्ण करत हे घर घेण्याचा निर्णय घेतला.   

14/14

सर्व फ्रँचायझींमध्ये राखून ठेवलेल्या एकूण 46 खेळाडूंपैकी 36 खेळाडू भारतीय आहेत. यापैकी 10 खेळाडू अनकॅप्ड भारतीय स्टार आहेत. अभिषेक पोरेल, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रमणदीप सिंग, हर्षित राणा, मोहसिन खान, आयुष बडोनी, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, यश दयाल हे खेळाडू आहेत.