दुबईत साजरा झाला सलमान खानचा भाचा `अहिल शर्मा`चा दुसरा वाढदिवस
बॉलिवूडचा दबंगस्टार आणि त्याचं लहानमुलांवरील प्रेम हे सर्वश्रुत आहे.
दुबई : बॉलिवूडचा दबंगस्टार आणि त्याचं लहानमुलांवरील प्रेम हे सर्वश्रुत आहे. अनेकदा सलमान खान लहान मुलांमध्ये रमताना दिसला आहे. सलमान खानचे त्याच्या भावंडांच्या मुलांसोबतही खास बॉन्डिंग आहे. खान कुटुंबियांचं शेंडेफळ असणार्या अर्पिता खान-शर्मासाठी सलमान थोडा अधिक हळवा आहे. 30 मार्चला अर्पिताचा मुलगा अहिल 2 वर्षांचा झाला. त्यामुळे त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशनही थाटात झाले.
सलमान खान दुबईत
अभिनेता सलमान खान सध्या 'रेस 3' या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. या चित्रपटाचा शेवटच्या टप्प्यातील अॅक्शन सिक्वेन्स सध्या अबुधाबीमध्ये शूट होत आहे. त्यामुळे सलमान खान 'रेस 3' च्या टीमसोबत दुबईमध्ये आहे. अशात अहिलचं बर्थ डे सेलिब्रेशनही दुबईतील अबुधाबीमध्येच करण्यात आले.
कुटुंबीयांसोबत झाले सेलिब्रेशन
अहिल शर्माचा आज ( 30 मार्च) दुसरा वाढदिवस आहे. त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी खान आणि शर्मा कुटुंबीयातील मंडळी अबुधाबीमध्ये पोहचली आहे. आयुष शर्मादेखील त्याचा आगामी आणि बॉलिवूडमधील पदार्पणाचा चित्रपट 'लवरात्री'साठी शूटिंग करत आहे. अहमदाबादमध्ये दिवसभर शूटिंग करून तो थेट दुबईत पोहचला. मध्यरात्री शर्मा कुटुंबीयांनी केक कापून जवळच्या नातेवाईकांसमवेत अहिलच्या बर्थडेचं सेलिब्रेशन केलं.
आयलॅन्डवर सेलिब्रेशन
यंदा Cipriani Yas या आयलॅन्डवर हे बर्थडे सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं आहे. मागील वर्षी मालदीवमध्ये अहिलचा पहिला बर्थडे साजरा करण्यात आला होता.