मुंबई: सलमान खान Salman Khan आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. पहिल्यांदा सलमान खानने आपला वाढदिवस मुंबईत साजरा केला आहे. त्याला कारणही तसं खास आहे सलमान खानची लाडकी बहिण अर्पिता खानने Arpita Khan आजच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सलमान खानला याहून सुंदर गिफ्ट कदाचित काहीच नसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्पिता खानने सी सेक्सनद्वारे आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. अर्पिता दुपारी सिटी रूग्णालयात एका गोंडस मुलीला (Baby Girl) जन्म दिला आहे. सलमान खानच्या वाढदिवशीच या मुलीचा जन्म झाल्याने खान कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 



गुरूवारी रात्रीपासूनच सलमान खानच्या बर्थ डे पार्टीचं सेलिब्रेशन सुरू होतं. या सेलिब्रेशननंतर अर्पिता रूग्णालयात दाखल झाली. आता खान आणि शर्मा कुटुंबियांकडून अधिकृत माहिती मिळाली आहे. अर्पिताने एका मुलीला जन्म दिला आहे. 


अर्पिताचं हे दुसरं मुलं आहे. अर्पिता आणि आयुष शर्मा यांनी 'आयत' Ayat असं या मुलीचं नाव ठेवलं आहे. आयुषने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मुलीचं नाव सांगितलं आहे. अर्पिताने 2014 मध्ये आयुष शर्मासोबत लग्न केलं आहे. 30 मार्च 2016 रोजी अर्पिताने अहिल या तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. आयुषने लग्नानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 2018 मध्ये त्याने 'लवयात्री' सिनेमात कामही केलं आहे.