मुंबई : हरियाणवी डान्सर ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणाऱ्या सपना चौधरीने अनेकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या अदांनी लखो, करोडो लोकांच्या मनात जादू केली आहे. पण कायम चाहत्यांच्या मनात राहणारी सपना आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सपनाला पोलिसांनी अटक वॉरंट जारी केली आहे.  (Arrest Warrant Against Sapna Chaudhary)अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी  शांतनु त्यागी (Additional Chief Judicial Magistrate Shantanu Tyagi) यांनी लखनऊच्या एका प्रकरणात सपनाविरुद्ध वॉरंट जारी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 नोव्हेंबर रोजी सुनावणी 
लखनऊ कोर्टात डान्सर आणि सिंगर सपना चौधरीच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शांतनू त्यागी यांनी हे वॉरंट जारी केले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे.


सपना चौधरीला अटक केल्यानंतर पोलीस तिला कोर्टात हजर करणार आहेत. होणार्‍या सुनावणीत सपनावरील सर्व आरोप कोर्टाला ठरवायचे आहेत, त्यामुळे तिने कोर्टात हजर राहणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एफआयआरनंतर सपनाने स्वत: तक्रार फेटाळण्यासाठी अर्ज केला होता, तोही अर्जानंतर फेटाळण्यात आला. मात्र आता हे प्रकरण पुन्हा उघड झाले आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण 3 वर्षे जुने आहे, 2018 साली सपना चौधरी विरुद्ध 14 ऑक्टोबर रोजी आशियाना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. 13 ऑक्टोबर रोजी लखनऊमधील स्मृती उपवन येथे दुपारी 3 ते 10 या वेळेत शो आयोजित केला होता, मात्र ती शोमध्ये पोहोचली नाही. 


सपना चौधरीचा शो पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते, मात्र 10 वाजेपर्यंत सपना चौधरी न आल्याने प्रेक्षकांनी गोंधळ घातला. मात्र गोंधळ होऊनही लोकांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. आता या प्रकरणी कोर्ट काय निर्णय घेणार हे येणारा काळचं ठरवेल.