Arshad Warsi Son Zeke Warsi : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीला कोणत्या ही ओळखीची गरज नाही. अर्शदनं 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'धमाल' आणि 'गोलमाल' सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अर्शद हा नेहमीच त्याचं खासगी आयुष्य हे लाइमलाईटपासून दूर ठेवतो. अर्शदनं 1999 मध्ये एमटीव्ही वीजे मारिया गोरेट्टीशी लग्न केलं. त्या दोघांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव जेके वारसी आहे, तर धाकट्या मुलीचे नाव हे जेने जो आहे. यावेळी अर्शद वारसीचा मुलगा चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे काल रात्री मुंबईच्या रस्त्यांवर दिसली. अर्शद वारसीच्या मुलाला पाहून लोकं हे म्हणू लागले आहेत की तो अगदी त्याच्या वडिलांवर गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेके वारसीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत जेके वारसी हा मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये त्याच्या काही मित्रांसोबत डिनरला पोहोचल्याचे पाहायला मिळते. तो जसा रेस्टॉरंटच्या बाहेर पोहोचला तसे पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. जेकेला पाहून आता अनेक लोक कमेंट करत आहेत की 'हा तर शॉर्ट सर्किट आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, किती क्यूट आहे हा. तिसरा नेटकरी म्हणाला, फाल्गुनी पाठक + शशि कपूर = अर्शद वारसीचा मुलगा. तिसरा नेटकरी म्हणाला, मला वाटलं की फाल्गुनी पाठक आहे. अनेक लोक त्याला अर्शद वारसीचं कार्बन कॉपी देखील म्हणाले. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

इंस्टंट बॉलिवूडसोबत दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत जेकेला विचारण्यात आलं होतं की 'त्याला अभिनय करण्यात आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे? यावर जेकेनं उत्तर दिलं की मला चित्रपटाची आवड आहे. मी 11 वी आणि 12 वीमध्ये अभ्यास देखील केला आणि मला खरंच यात मज्जा आली. त्यामुळे मला असं वाटतं की मी तेच करेन पण मला माझ्यावर थोडं आणखी काम करण्याची गरज आहे, आमचे स्किल्सला आणखी चांगल्या करण्यासाठी मेहनत करायची आहे आणि मग पुढे पाहूया की काय होतंय.'


हेही वाचा : 'इन सरहदों पर जब गुरु के बाज पहरा देते हैं!' Border 2 मध्ये वरुण धवननंतर आता 'या' अभिनेत्याची एन्ट्री


अर्शद वारसीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो सगळ्यात शेवटी 'असुर 2' आणि 'मॉडर्न लव मुंबई' मध्ये दिसला होता. तो लवकरच 'जॉली एलएलबी' च्या तिसऱ्या भागात दिसणार आहे आणि या चित्रपटात त्याच्यासोबत अक्षय कुमार दिसणार आहे.