मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा एक असा शो आहे. ज्यामध्ये प्रत्येकजण या शोमध्ये भाग बनण्याची इच्छा करतो. गेली 13 वर्षे या शोने केवळ टीआरपीमध्येच नव्हे तर लोकांच्या हृदयातही स्थान निर्माण केलं आहे. केवळ शोच नाही तर, शोचे पात्रही लोकांना भयंकर आवडतात. त्याचवेळी, अशी बातमी समोर आली आहे की, शोमध्ये एक नवीन पात्र दाखल होणार आहे, ज्याची भूमिका अर्शी भारती साकारणार आहे. अर्शी भारती कोण आहे आणि तिला या शोचा भाग बनण्याची संधी कशी मिळाली हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्शी भारती या पात्रामध्ये दिसत आहे
आजकाल शोची कथा तारक मेहता आणि त्याच्या कार्यालयाभोवती फिरत आहे. तारक बऱ्याच दिवसांनी ऑफिसला जात आहे पण जेठालालच्या सांगण्यावरून तो खोटे बोलून बॉसकडून रजा घेतो. अर्शी भारती तारक मेहताच्या बॉसच्या सेक्रेटरीची भूमिका बजावताना दिसत आहे. राकेश बेदी तारक मेहताच्या बॉसच्या भूमिकेत आहे. तसं, अर्शी भारती यापूर्वी अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसली आहे, ती कृती सेनन आणि अर्जुन कपूरच्या चित्रपट पानिपतमध्ये होती आणि कृती सेननच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली होती.


शोमध्ये सापडलेल्या या भूमिकेविषयी अर्शी भारती म्हणाली की, तिने ऑडिशन दिलं होतं आणि ऑडिशन दिल्यानंतर ती विसरुन गेली. पण एका आठवड्यानंतर तिला फोन आला की, तिला शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. हे ऐकून तिला आश्चर्याचा धक्का बसला. पण ही बातमी ऐकल्यानंतर त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. आता ती तारक मेहता का उल्टा चश्माचा भाग बनून आणि अशा मोठ्या कलाकारांसोबत काम करताना खूप आनंदी आहे.