मुंबई : 'इन्साफ की भीक मत मांगो, बहुत मांग चूके...' फक्त तीन रूपयांसाठी दोन बहिणींचा सामूहिक बलात्कार करण्यात येतो. विविध जातींच्या पेचात अडकलेले लोक. आपली जात सर्वात श्रेष्ठ समजणाऱ्या उच्चवर्णींयांमुळे समाजात पसरलेली असमानता. धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांमध्ये होणारा भेदभाव इत्यादी विषयांभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. चित्रपटात आयुषमान एका पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता आयुषमान खुरानाने स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. चित्रपटाची कथा २०१४ मध्ये उत्तर प्रदेशच्या बदायू येथे झालेल्या सामूहिक बलात्कारावर आधारलेली आहे. या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडाली होती.


धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर राज्य आता आपल्या नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही, असे चित्र 'आर्टिकल-१५' चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न सिन्हा यांनी केला. 


'आर्टिकल-१५' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारलेला आहे. २१व्या शतकात सुद्धा जनता जात, पात, लिंग, वंश इत्यादींच्या जाळ्यात अकलेला आहे. यंदाच्या वर्षी २८ जून रोजी 'आर्टिकल-१५' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.