Arundhati Second Marriage : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेनं सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेत एकामागे एक ट्वीस्ट आपण पाहत आहोत. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे अरुंधतीच्या लग्नाची. अरुंधती दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न जेव्हा पासून ठरलं आहे. तेव्हापासून फक्त त्याचीच चर्चा सुरु आहे. हे पाहता अनेक लोकांनी सोशल मीडियावर मालिकेला निशाण्यावर धरलं आहे. आता या सगळ्या प्रकरणावर मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरनं (Madhurani Gokhale Prabhulkar) प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुराणीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अरुंधतीनं मालिकेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत मधुराणी म्हणाली, "अरुंधतीचं लग्न…, हे व्हावं की नाही…? ह्या वयात लग्न करावं का…? केलं तर ते इतकं साजरं करावं का? अशी विविध स्तरावर समाजात चर्चा झाली, होतेय. अनेकांना यात आनंद होतोय तर काही जणांना मान्य होत नाहीये. पण मला नक्की असं वाटतं की, कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. ते प्रौढ वयात होतंय, किंवा दुसरेपणाचं आहे म्हणून लपून छपून, साधेपणाने करावं असं का? लग्न आहे ते… साजरं करावं." 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे मधुराणी म्हणाली, "हा इतका प्रागतिक विचार करणाऱ्या आमच्या वाहिनीचे स्टार प्रवाहचे आणि आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता नाडकर्णीचे आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर ह्यांचे खरोखर धाडस आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे”.


हेही वाचा : 'अन् मी हॉटही तितकीच...', सावळ्या वर्णावरून ट्रोल करणाऱ्याला Kavita Kaushik चे सडेतोड उत्तर


मधुराणीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. मधुराणीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'आजकाल सगळ्याच मालिकांमध्ये चुकीचं दाखवलं जात आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अनिरुद्धनं केलं तेच अरुंधती करत आहेत.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सगळं मान्य. पण मुलगीच सुन होणार का?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तुम्ही जे बोलत आहात त्याच्याशी मी सहमत आहे मॅडम.'