मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळालीये. आर्यन खानचं नाव गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ड्रग प्रकरणात आलं होतं. त्यानंतर आता एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यनच्या नावाचा उल्लेख नाही. मात्र, आर्यनने ड्रग्ज घेण्याबाबत सांगितलं होतं, असं एजन्सीने या आरोपपत्रात नमूद केलंय.


आर्यनने मान्य केली ड्रग्ज घेण्याची बाब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनसीबीने शुक्रवारी मुंबई न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 20 ते 14 जणांची नावं देण्यात आली. आर्यन खानसह सहा जणांची नावं आरोपपत्रात नाहीत. 


एनसीबीच्या म्हणण्याप्रमाणे, या सहा जणांविरुद्ध पुराव्याअभावी त्यांची नावं आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली नाहीत. अशा परिस्थितीत एनसीबीच्या चौकशीदरम्यान आर्यन खानने गांजा घेतल्याची बाब मान्य केल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलंय. त्यामुळे आता यामुळे आर्यनच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, आर्यन खानने 2018 साली अमेरिकेत ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली होती, असं म्हटलंय. आर्यन त्यावेळी अमेरिकेत महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. अशा स्थितीत त्याला स्लिप डिसॉर्डरचा त्रास झाला. यावेळी त्याने इंटरनेटवरील काही आर्टिकलमध्ये वाचलं होतं की ड्रग्ज या समस्येत फायदेशीर ठरू शकतात.


आर्यन खानच्या फोनमध्ये सापडलेले व्हॉट्सअॅप चॅट त्याने मान्य केल्याचं एनसीबीने म्हटलंय. आरोपपत्रानुसार आर्यन खानने एनसीबीला सांगितलं होतं की, तो मुंबईतील वांद्रेच्या एका डीलरला ओळखतो. मात्र त्यांना त्या डीलरचं नाव व ठिकाण माहीत नाही. हा डीलर त्याचा मित्र अचित याच्याशी संबंधित असून अचित हा ड्रग्ज प्रकरणातही अडकला होता.