मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान Aryan Khan ने भलेही चित्रपटांमध्ये डेब्यू केला नसेल पण तो एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. नेहमी तो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता ज्युनियर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो अनन्या पांडे Ananya Panday कडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटिझन्स कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. नुकतंच अनन्याने सांगितलं होतं की,  आर्यन खान तिचं क्रश आहे आणि हा व्हिडिओ तिच्या या वक्तव्यानंतरचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन अनन्याकडे दुर्लक्ष करतो
वास्तविक, नुकतीच अनन्या पांडे माधुरी दीक्षितच्या आगामी 'माजा मा' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली होती. आर्यन खानही त्याची बहीण सुहाना खानसोबत या कार्यक्रमात पोहोचला होता. आता या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आर्यन खान अनन्या पांडेच्या बाजूने जाताना दिसत आहे. पण आर्यन खानने अनन्या पांडेकडे पुर्णपणे दुर्लक्ष केलं आणि तेही जेव्हा अभिनेत्रीने कबूल केलं की, तिचं आर्यनवर क्रश आहे.


व्हिडिओ व्हायरल होत आहे
या व्हायरल व्हिडिओने नेटिझन्सनाही आश्चर्यचकित केलं आहे की, आर्यनने अनन्याकडे कसं दुर्लक्ष केलं. व्हायरल क्लिपमध्ये दोघांनी डोळा मारलाही नाही. या व्हिडिओला रिप्लाय देताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले - 'ही कोण आहे जिला आर्यनने पाहिलंही नाही'. याशिवाय आणखी एका यूजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, 'आर्यनने अनन्या पांडेकडे किती वाईट पद्धतीने दुर्लक्ष केलं.' बरं, याआधीही आर्यन खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एअरपोर्टवर एक चाहती त्याला फुलं देते आणि त्याच्या हातावर किस करते. ( Aryan Khan badly ignores Ananya Panday keep watching liger star)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आर्यन दुसऱ्या चाहत्यासोबत सेल्फी काढण्यात व्यस्त होता. आर्यनचं हे वागणं चाहत्यांना आवडलं नाही. यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोलही करण्यात आलं. एका मुलाखतीत शाहरुख खानने खुलासा केला होता की, त्याचा मुलगा आर्यन अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत येण्याचा अजिबात विचार करत नाही. विशेष म्हणजे आर्यनला चित्रपट दिग्दर्शनात रस आहे. तो लवकरच एका चित्रपटाचं दिग्दर्शन करताना दिसेल असं वाटतं.