मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या बराच अडचणींचा सामना करत आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये आर्यन सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे. ज्यामुळं त्याचा कारागृहातील मुक्काम सतत वाढतच चालला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यनच्या अडचणींत होणारी वाढ पाहता, बॉलिवूडमधून त्याला पाठिंबा देणारी एक फळीच तयार जाली आहे. शाहरुख आणि आर्यनला पाठिंबा देत खान कुटुंबाला आधार देणारे अनेक हात कलाविश्नातून पुढे आले आहेत. पण, अशा प्रकरणी कलाकार एकवटण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 




सध्या इंटरनेटवर सलमान खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांचे असे फोटो व्हायरल होत आहेत जिथं ते एक पोस्टर पकडून उभे असल्याचं दिसत आहे. हे व्हायरल  होणारे फोटो त्या वेळचे आहेत जेव्हा 1993 बॉम्बस्फोटांमध्ये अभिनेता संजय दत्त अडचणींच्या विळख्यात अडकत गेला होता. 'Sanju We're With You'  असं त्या पोस्टवर लिहिण्यात आलं होतं. याचाच अर्थ असा की संजय दत्तला कलाविश्वातून मोठा आधार मिळाला होता. आता महत्त्वाचा मुद्दा असा की, शाहरुखच्या कुटुंबावर इतकं मोठं संकट असताना संजय दत्त काही कृती करतो का....