मुंबई : बॉलीवूडचा बादशाह म्हटल्या जाणार्‍या अभिनेता शाहरूख खानच्या लग्नाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरुख आणि गौरीचे नाव आज इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या कपल्समध्ये घेतले जाते. शाहरुख खान मुस्लिम आहेत तर गौरी हिंदू आहेत. मात्र, किंग खानच्या म्हणण्यानुसार तो आपल्या मुलांना  आधी ते भारतीय आहेत असा सल्ला देतो. किंग खानच्या घरी सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे होतात, मग ती ईद असो किंवा  होळी-दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं सगळं असूनही शाहरुख आणि गौरीच्या मुलांची कुठल्या धर्मावर जास्त श्रद्धा आहे, असा प्रश्न अनेकदा विचारण्यात येतो. एकदा एका मुलाखतीत गौरी खानलाही याबाबत विचारण्यात आले होते, प्रश्नाचं उत्तर देताना गैरी म्हणाली, 'आर्यनवर त्याचे वडील शाहरुख खान यांचा खूप प्रभाव आहे आणि तो स्वत:ला मुस्लिम समजतो'. 


गौरीच्या म्हणण्यानुसार, आर्यनने स्वतःला मुस्लीम समजत असल्याचे कबूल केले आहे. स्वत: हिंदू आणि शाहरुख मुस्लिम असल्याच्या प्रश्नावर गौरीही मोकळेपणाने बोलली. गौरी म्हणते, 'मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते पण याचा अर्थ असा नाही की मी त्याचा धर्म स्वीकारावा, शाहरुख खानही या गोष्टीची काळजी घेतो'. 


वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, बऱ्याच दिवसांनी शाहरुख खान 'पठाण' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. पण सध्या त्याने ब्रेक घेतला आहे. आर्यन खान तब्बल 25 दिवसांनंतर जोलमधून बाहेर आल्यानंतर शाहरुखने काही दिवस मुलासोबत रहाण्याचा निर्णय घेतला आहे.