Aryan Khan Bail : असं आटोपलं न्यायालयातील `घमासान`; ...आणि न्यायाधिशांनी सोडली `ती` ऑर्डर
मुकुल रोहतगींनी अशा प्रकारे लावलं कसब पणाला
मुंबई : Aryan Khan ला अखेर 25 दिवसांनंतर न्ययायालयानं जामीन मंजूर केला आणि शाहरुखसह अनेकांनाच मोठा दिलासा मिळाला. NCB कडून अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंग या प्रकरणी युक्तिवाद मांडत होते. तर, बचावपक्षाच्या वतीनं सतीश मानेशिंदे, माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात काही मुद्दे मांडले आणि प्रकर्षाने उचलून धरले.
एनसीबीचं काय म्हणणं?
आर्यन हा गेल्या दोन वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे. मोठ्या प्रमाणात आणि हार्ड ड्रग्स तो घेत होता. Ncb कडून दोघांना अटक करण्यात आले, तो ड्रग पेडलर आहे, अचित कुमार असे त्याचे नाव असून आर्यनचा त्याच्याशी संबंध असल्याचे दिसत आहे. तो कटकारस्थान रचत असल्याचे दिसून असले मग 29 कलम लावण्यात आले.
आर्यन कटकारस्थानचा भाग होता. आर्यन सोबत असताना अरबाजने drugs जवळ का बाळगले? drugs कारणासाठी जवळ बाळगणे आणि त्याचे सेवन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. याबाबत चॅट, पंचनामा, जबाब, सिक्रेट नोट्समध्ये यामध्ये आम्हाला अनेक पुरावे मिळाले आहेत.
अरबाजकडे drugs होते याची आर्यनला कल्पना होती, प्रवास दरम्यान तो त्याचे सेवन करणार होता, अरबाजच्या बुटाच्या झिप पाऊचमध्ये drugs होते आणि दोघेही त्याचे सेवन करणार असल्याचे अरबाजने कबुल केले आहे.
अनिल सिंग यांनी इथवर केलेला युक्तिवाद हा सेवन करणार 'होते', commercial कारणासाठी drugs चा वापर करणार 'होते' असे करण्यात आले. यासाठी त्यांनी विविध केसचे दाखले दिले.
आर्यन आणि अरबाजच्या वकिलांनी अटक बेकायदा होती असा युक्तिवाद केला. न्यायाधीशांना whatsapp chats दाखवलेही गेले.
रोहतगींनी न्यायालयात काय म्हटलं?
पार्टीमध्ये जवळपास तेराशे लोक होते, मात्र आर्यनचा संबंध केवळ अरबाजशी दाखवण्यात आला आणि अचित कुमारशी, इतर कोणाशीही नाही, एनसीबी म्हणते की, अनेकांचा संबंध हा योगायोग नाही.
कटकारस्थान होण्यासाठी अनेकांनी मन-बुद्धीने एकत्र येणे आवश्यक असते, तो प्रकारच इथे एनसीबीने दाखवलेला नाही,आर्यनविरुद्ध कटात सहभागी असल्याचा कोणताच पुरावा नाही.
शेवटच्या टप्प्यामध्ये माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी आपला युक्तीवाद मांडत हे कटकारस्थान कसं, जेव्हा आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत, ड्रग्जची कमर्शिअल क्वांटीटी पाच-सहा जणांना मिळून दाखवण्यात आली होती.
नावं पुढे आलेल्यांपैकी कोणीच एकमेकांना ओळखत नव्हता मग हे कटकारस्थान कसं असा प्रश्न आर्यनच्या वकिलांनी मांडला होता. ज्यानंतर न्यायाधीशांचं समाधान झालं आणि त्यांनी Allowed या एका शब्दात आर्यनचा जामीन मंजूर करत ही ऑर्डर सोडली आणि हे 'घमासान' निकाली निघालं.
आर्यन आणि त्याच्यासोबत ताब्यात असणाऱ्यांविरोधात एनसीबीला कोणताही तगडा पुरावा सादर करता आला नाही.