Aryan Khan Religion Hindu Or Muslim : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन (Aryan Khan) हा लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. आर्यन हा गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत होता. दरम्यान,  मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की आर्यन हा नक्की कोणता धर्मा मानतो. कारण त्याचे वडील म्हणजे शाहरुख हा मुस्लिम आहे तर त्याची आई गौरी (Gauri Khan) ही हिंदू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत आर्यनचा कोणत्या धर्मावर विश्वास आहे असा प्रश्न विचारता त्यावर गौरी खाननं स्वत: उत्तर दिलं होतं. आर्यन कोणता धर्म स्विकारतो यावर उत्तर देत गौरी म्हणाली, 'त्यांच्या घरी सगळे सण साजरे होता. होळी असो किंवा मग ईद सगळेच साजरे होतात. आर्यन त्याच्या वडिलांच्या अतिशय जवळ आहे आणि शाहरुख ज्या गोष्टी करतो ते फॉलो करतो. आर्यन स्वत:ला मुस्लिम मानतो'. (Aryan Khan Is Hindu Or Muslim) 



याच मुलाखतीत गौरीला पुढे तू लग्नानंतर धर्म परिवर्तन का केले नाहीस? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देत गौरी म्हणाली, 'माझं शाहरुखवर मनापासून प्रेम आहे आणि त्याचा मी आदर करते. याचा अर्थ असा होत नाही की मी त्याचा धर्म पाळवा. हेच शाहरुखलाही लागू होते.' 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखची लाडकी लेक सुहानाला (Suhana Khan) लहान असताना शाळेत एक फॉर्म भरायचा होता. या फॉर्ममध्ये एका ठिकाणी आपला धर्म लिहायचा होता. त्यावेळी सुहानानं शाहरुखला प्रश्न विचारला की धर्म काय असतो. त्यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला, 'आपण भारतीय आहोत आणि आपला कोणताही धर्म नाही.'


हेही वाचा : Vanita Kharat च्या लग्नात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', मंडपातील आनंदाचे क्षण Viral


दरम्यान, काही दिवसांपूर्वी आर्यन हा पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्या बातमीवर अभिनेत्रीनं प्रतिक्रिया दिली होती. आर्यनचा पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानसोबतचा ( Sadia Khan) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याआधी आर्यन हा बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. 


याआधी तर आर्यन हा बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात आणि श्वेता बच्चनची लेक नव्या नवेली नंदासोबत (Navya Naveli Nanda) रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, त्या बातमीवर कोणही काही प्रतिक्रिया दिली नव्हती. 


दुसरीकडे शाहरुख हा सध्या त्याच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुखच्या 'पठाण'नं (Pathaan) पाच दिवसात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत 545 कोटींची कमाई केली होती.