Happy Birthday Aryan Khan : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (aryan khan) एक प्रसिद्ध स्टारकिड तर आहेत, पण आर्यन ड्रग्स प्रकरणामुळे देखील तुफान चर्चेत आला. ड्रग्स प्रकरणात (aryan khan mumbai drug party) आर्यनचं नाव आल्यानंतर तो अनेक दिवस तुरुंगात देखील होता. आर्यन खानला क्लिन चिट मिळाल्यानंतर खान कुटुंबाने आणि चाहत्यांनी आनंद साजरा केला. आज आर्यनचा वाढदिवस आहे. तर आर्यनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या संपत्तीबद्दल जाणून घेवू.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन खान कोट्यवधी रुपयांचा मालक
मीडिया रिपोर्टनुसार, वायाच्या 25 व्या वर्षी आर्यन खान कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. वाढत्या लोकप्रियतेनंतर आर्यनच्या संपत्तीमध्ये देखील कमालीची वाढ होत आहे. 2020 मध्ये आर्यनची एकूण संपत्ती सुमारे $120-140 मिलियन डॉलर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


मुंबईत आर्यनची तीन घरं आहेत. स्टारकिडच्या तीन घरांची किंमत जवळपास 200 कोटी इतकी आहे. आर्यन खानच्या घरात अंडरग्राउंड कार पार्किंग, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल आणि गार्डन आहे. शिवाय आर्यनची घरे अनेक महागड्या वस्तूंनी सजवलेलं आहे. (aryan khan net worth 2021 in rupees)


आर्यनच्या महागड्या गाड्या आणि लंडनमध्ये घर 
रिपोर्टनुसार, त्याच्याकडे BMW 650LI, Bentley आणि Ferrari 458 यांरसख्या महागड्या गाड्या आहेत. शाहरुख खानने आर्यनला त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने लंडनमध्ये एक घर भेट दिलं आहे. एवढंच नाही तर, शाहरुखने आर्यनला दुबईमध्ये देखील एक घर भेट म्हणून दिलं आहे. ज्या घराची किंमत 30 कोटी असल्याचं सांगितलं जातं. (aryan khan car collection)


आर्यन खानचं करियर
आर्यन खानला अभिनयात रस नसून तो निर्मिती आणि दिग्दर्शनात काम करत आहे. (aryan khan profession) आर्यन खानने लहान वयातच करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेतून करिअरला सुरुवात केली होती. (aryan khan net worth in rupees 2022)


The Incredibleमध्ये 'तेज' नावाच्या मुलाला आर्यनने आपला आवाज दिला. आर्यनला 2004 मध्ये सर्वोत्कृष्ट डबिंग चाइल्ड आर्टिस्टचा पुरस्कारही देण्यात आला होता. त्यामुळे आर्यन आता बॉलिवूडमध्ये स्वतःच्या नावाचा ठसा कसा उमटवणार हे येणारा काळच  ठरवेल.