Aryan Khan with Orry : सगळेच अजून न्यू ईयरच्या स्वागत करत आहेत. त्यात सेलिब्रिटींची पार्टी तर हटकेच असते. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी करीना कपूर पासून आलिया भट्ट- रणबीर कपूर आणि विकी कौशल-कतरिना कैफ पर्यंत सगळेच कुठे बाहेर गेले आहेत. कोणी स्विट्जरलॅन्डमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करत आहे. तर कोणी दुबई, ऑस्ट्रेलियात तर कोणी मुंबईतच नवीन वर्षाचे स्वागत केले. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं यावेळी मुंबईतच नवीन वर्षाचे स्वागत केले. मुंबईच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये एका भव्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्याचे सगळेच मित्र उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. त्या सगळ्यात ऑरी देखील तिथे स्पॉट झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन खानच्या फॅन क्लबनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आर्यन खान आणि ऑरी एका बार काउंटर जवळ असल्याचे पाहायला मिळते. तर यावेळी ते दोघं एकत्र शॉट्स घेताना दिसले. त्यांच्यासोबत वेदांत महादन देखील दिसला होता. तर वेदांत महाजन यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून अजय देवगणची लेक न्यासासोबत जोडण्यात येत आहे. तर ही पार्टी आर्यन खानचं ब्रॅंड अल्कोहलकडून या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचं म्हटलं जातं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, दुसरीकडे आर्यन खानची बहीण सुहाना खान रुमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्य नंदासोबत न्यूज ईयर पार्टी साजरा करण्यासाठी बाहेर गेली होती. त्यांच्यासोबत यावेळी अगस्त्य नंदाची बहीण नव्या नवेली नंदा देखील दिसली. 


हेही वाचा : VIDEO : अभिनेत्रीच्या मुलीसोबत दिसला सैफचा मुलगा; न्यू इयर पार्टीनंतर फोटोग्राफर समोर येताच लपवला चेहरा


काही दिवसांपूर्वी त्यानं त्याचं वोडका ब्रॅंड लॉन्च केलं होतं. याशिवाय आर्यननं भारतात एक बीयर बनवणाऱ्या कंपनीसोबत पार्टनरशिप देखील केली आहे. याशिवाय आर्यनचं एक क्लोदिंग ब्रॅंड देखील आहे. आर्यन हा त्याच्या आई-वडिलांप्रमाणे एक चांगला बिझनेसमॅन आहे, असं म्हणायला हरकत नाही. तर आर्यनला अभिनेता व्हायचं नाही, तर त्याला फिल्ममेकिंगमध्ये करिअर करायचं आहे. यावेळी तो त्याच्या एका वेब सीरिजवर काम करत आहे. त्याच्या या वेबसीरिजचं नावं 'स्टारडम' असल्याचे म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार, यात करण जोहर आणि रणवीर सिंग या दोघांची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. सुहाना विषयी बोलायचे झाले तर ती यंदाच्या वर्षी ती आणि शाहरुख खान एकत्र स्क्रिनवर दिसण्याची शक्यता आहे.