VIDEO : अभिनेत्रीच्या मुलीसोबत दिसला सैफचा मुलगा; न्यू इयर पार्टीनंतर फोटोग्राफर समोर येताच लपवला चेहरा

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan : पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान या दोघांनी एकत्र केलं नवीन वर्षाचं स्वागत. पापाराझींना पाहताचं लपवलं तोंड

दिक्षा पाटील | Updated: Jan 1, 2024, 12:37 PM IST
VIDEO : अभिनेत्रीच्या मुलीसोबत दिसला सैफचा मुलगा; न्यू इयर पार्टीनंतर फोटोग्राफर समोर येताच लपवला चेहरा title=
(Photo Credit : Social Media)

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खाननं नवीन वर्षाचे एकत्र स्वागत केले. पापाराझींनी या दोघांना जेव्हा एकत्र स्पॉट केले तेव्हा इब्राहिम त्याचा चेहरा लपवू लागला. पलक तिवारी आणि इब्राहिमचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून इब्राहिम अली खान आणि पलक डेट करत असल्याचे म्हटले जाते. ते दोघे एकमेकांना डेट करण्याच्या चर्चांवर काही वक्तव्य केलं नाही. तर त्याशिवाय ते दोघं अनेकदा एकत्र स्पॉट होतात. पण त्यांच्यात असलेलं प्रेम हे कोणापासून लपलेलं नाही. त्यात आता त्या दोघांनी एकत्र नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. ते दोघं उशिरा एकत्र स्पॉट झाले. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते दोघं गाडीत बसल्याचे पाहायला मिळते. तर जेव्हा ते मीडियाला पाहतात तेव्हा ते दोघं तोंड लपवताना दिसतात. व्हिडीओत पाहू शकतात की पलकनं तिचा चेहरा खाली केला आहे तर इब्राहिमनं तर थेट त्याचा चेहरा हाथानं लपवला. 

पाहा व्हिडीओ 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी त्या दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'हे त्यांचा चेहरा का लपवतात?' दुसरा नेटकरी म्हणाला की 'आता तर पाहिलं मग का तोंड लपवलं.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'जर तुम्हाला तोंड लपवायचंच आहे, तर एकत्र येतातच का? तर एका नेटकऱ्यानं तर हद्दच पार केली.' त्यानं थेट श्वेताला टॅग करत लिहिलं की 'पाहिलं का तुझी मुलगी काय करते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'या' बालकलाकारानं गुड लुक्समध्ये बिग बींना टाकलं मागे, 2 अफेअर 4 लग्न; तुम्ही ओळखलं त्याला?

दरम्यान, त्या दोघांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर पलक तिवारीनं सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर इब्राहिम अली खाननं करण जोहरला रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटासाठी असिस्ट केलं होतं. इब्राहिम अली खान हा लवकरच खुशी कपूरसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.