मुंबई : ज्येष्ठ भावगीत गायक अरूण दाते यांचं रविवारी पहाटे निधन झालं, अरूण दाते यांना काही दिवसांपासून बरं नव्हतं. अरूण दाते यांच्या निधनाने त्यांचे असंख्य चाहते भावू झाले आहेत. अरूण दाते यांची गाणी प्रचंड गाजली आणि अजरामर झाली. अरूण दाते गेल्यानंतर त्यांच्या गाण्यांची आठवण प्रत्येक चाहत्याला होत आहे. अरूण दाते यांची तशी अनेक गाणी गाजली, पण अरूण दाते यांच्या निधनानंतर त्यांचं, असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे गीत सर्वांच्या मनात jरूंजी घालतंय, अरूण दातेंची त्यांच्या गाण्यांनी पुन्हा त्यांच्या आठवणींची हूरहूर लावली आहे. अरूण दाते यांनी गायलेलं हे भावगीत, शांता शेळके यांनी लिहिलं आहे, तर संगीत यशवंत देव यांनी दिलं आहे, हा राग भैरवी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे


हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले
तसे काहिसे मनी तुला बघून वाटले
तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे


स्वये मनात जागते, न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे


कुणास काय ठाउके कसे, कुठे, उद्या असू?
निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे



गीत - शांता शेळके
संगीत - यशवंत देव
गायक - अरूण दाते
राग - भैरवी
गीत प्रकार - भावगीत