मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सर्वांना त्यांच्या गोड आवाजाने मंत्रमुग्घ केलं आहे. आता त्या लवकरचं 'इंडियाज बेस्ट डान्सर 2' मध्ये खास पाहुण्या म्हणून दिसणार आहेत. 'इंडियाज बेस्ट डान्सर 2'  शोच्या आगामी एपिसोडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा आणि डान्सर टेरेन्स लुईस देखील उपस्थित आहेत. पण आशा भोसले यांचं आणखी एक टॅलेंट पाहून त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडियाज बेस्ट डान्सर 2'  स्टेजवर आशा यांनी चक्क गाण्यावर ठेका धरला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये त्या वयाच्या ८८ व्या वर्षी धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत.  सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ. 



व्हिडीओमध्ये त्या परीक्षकांसोबत बोलताना दिसत आहेत. त्या त्यांच्या आवडत्या डान्सरबद्दल सांगत आहेत. त्यानंतर असं काही होतं त्या क्षणात उठतात आणि अभिनेता हृतिक रोशनच्या गाण्यावर (Hrithik Roshan's signature step) डान्स करू लागतात. त्यांचाा हा वेगळा अंदाज पाहून प्रेक्षक देखील दंग 
होतात.