मुंबई : मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर सोहळा २०१८ रंगला आहे. उस्ताद अमजद अली खान यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्यात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी एक प्रसंग सांगितला व्यासपिठावरून एक गाणं ऐकून दाखवलं आणि रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. यावेळी आशा भोसले या आपल्या वडिलांच्या आठवणीत रमल्या होत्या, वडिलांचा आवाज त्यांचं गाणं आजही आशा भोसले यांच्या लक्षात आहे, असं त्यांनी सांगितलं आणि गाणं म्हणून देखील दाखवलं. यावेळी हिंदी गाणं ऐकवण्याची प्रेक्षकांची मागणी आली, पण त्यांनी हा मराठी कार्यक्रम असल्याचं आशा भोसले यांनी सांगितलं. हा क्षण आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.