मुंबई : विठ्ठल भक्तांचा श्वास आणि ध्यास असणारी पंढरीची पायी वारी कोरोनामुळे यावर्षी थांबवावी लागली. विठ्ठला, जीवात जीव असेपर्यंत दरवर्षी पायी वारी करत तुझ्या दर्शनाला येईन असा विठ्ठलाला शब्द दिलेल्या वारकऱ्यांच्या काळजाचा जणू ठोकाच चुकला. या आषाढीला चंद्रभागेच्या तीरी झेंडा पताका फडकणार नाहीत, हरिनामाचा जयघोष होणार नाही, रिंगण होणार नाही, वारकऱ्यांना विठू माऊलीचं दर्शन घेता येणार नाही. याची देही याची डोळा विठ्ठलरूप मनात साठवता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धांवोनियां आलो पहावया मुख । गेले माझे दुःख जन्मांतरिंचे ॥
ऐकिले ही होते तैसे चि पाहिले । मन स्थिरावले तुझ्या पायी II


तासनतास दर्शन रांगेत उभं राहून माऊलीचं दर्शन घेऊन मुक्ती अनुभवणारे आपले वारकरी. यावर्षी मात्र विठ्ठलाच्या वारकऱ्यांसाठीची आनंदाची पर्वणी अर्थात वारी आळंदीहून निघाली नाही.




असे हे विठ्ठलाचे आगळंवेगळे दर्शन ' सेवेच्या रुपात कोल्हापूर फिल्म कंपनी ' विठ्ठल भक्तांचरणी रुजू करत आहे.