मुंबई : एखाद्या वळणावर कोणी आपसूक आपलासा वाटतो, जणू तो व्यक्ती मनात घर करुन जातो. एक दिवस अशा व्यक्तिच्या आपण प्रेमात पडतो. हे प्रेम कधी कोठे कसे होते याचा ठांग पत्ता लागत नाही. प्रेम म्हंटलं की राग रुसवे आणि बरचं काही येतचं. अशाच एका प्रेमि युगुलाची कथा लवकरच चाहत्यांना अनुभवता येणार आहे. जेष्ठ अभिनेता सचिन पिळगांवर दिग्दर्शित सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचे नाव ‘अशी ही आशीकी’आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


नुकताच व्हॅलेन्टाईन्स डे सगळ्यांनी साजरा केला, याच प्रेम दिवसाचे औचित्य साधत सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. सिनेमात अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री हेमल इंगळे या दोन तरुण युगलांची प्रेम कथा १ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनय आणि हेमल व्यतिरिक्त सुनिल बर्वे, निर्मिती सावंत, करण भानुशाली, स्नेहल वाडकर, अणि सिद्धेश नागवेकर हे कलाकार झळकणार आहेत.  गुलशन कुमार प्रस्तुत ‘अशी ही आशिकी’सिनेमाची निर्मिती टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे.