`या` सिनेमातून अशोक पत्कींचा मुलगा आशुतोष रुपेरी पडद्यावर!
मराठी सिनेसृष्टीत आता नवनवीन विषयांवर सिनेमे तयार होत आहे.
मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आता नवनवीन विषयांवर सिनेमे तयार होत आहे. असाच एक वेगळया धाटकीचा सिनेमा ‘Once मोअर’ नरेश बिडकर यांनी तयार केला. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या नरेश बिडकरांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमातून एक नवीन कलाकार सिनेसृष्टीत पर्दापण करणार आहे.
कोण आहे हा कलाकार?
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष पत्की पहिल्यांदाच या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. मेंदीच्या पानावर आणि दुर्वा या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेला आशुतोषचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे.
रितसर शिक्षण घेऊन पर्दापण
बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या आशुतोषचं अभिनय हे पॅशन आहे. त्यामुळे अनुपम खेर अॅकॅडमीतून त्याने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे.
सिनेमात कलाकारांची मांदियाळी
त्याचबरोबर या सिनेमातून आशुतोषबरोबरच धनश्री दळवी हा नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर या सिनेमात रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार हे कलाकार देखील आहेत.