मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीचे मामा अर्थात अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सरप्राईज मिळालं.... आणि ते 'शेंटीमेंटल' झालेले पाहायला मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ यांच्या ४ जूनला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'शेंटीमेंटल' या आगामी चित्रपटाची घोषणा करत लेखक-दिग्दर्शक समीर पाटील यांनी चांगलंच सरप्राईज दिलं. यावेळी त्यांनी एक अनोखं पोस्टरही प्रदर्शित केलं. 


'पोस्टर बॉईज' आणि 'पोस्टर गर्ल्स' या यशस्वी चित्रपटानंतर पाटील आता 'शेंटीमेंटल' घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हवालदाराच्या वेषात असलेल्या अशोक मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या... आणि 'पांडू हवालदार' 'सेंटीमेंटल' झाला!


हवालदाराचा वेष मामांसाठी खूप खास आहे! १९७५ मध्ये त्यांच्या करियरची सुरुवात 'पांडू हवालदार' या चित्रपटाने झाली होती. त्यात त्यांची हवालदारची भूमिका खूप गाजली होती आणि आज ४२ वर्षानंतर ‘शेंटीमेंटल' या चित्रपटातदेखील ते हवालदारच्या किंबहुना हवालदाराच्या भूमिकेतून बढती घेऊन सहाय्यक पोलीस उप-निरीक्षकाच्या भूमिकेत येत आहेत. 


२८ जुलैला प्रेक्षकांना हसून हसून मेंटल करायला 'शेंटीमेंटल' येतोय, त्याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागून राहिली आहे!