मुंबई : बॉबी देओल (Bobby Deol)ची बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'आश्रम 3' चा टीझर रिलीज झाला आहे. 1 मिनिट 11 सेकंदाच्या टीझरमध्ये बॉबी देओल त्याच्या आश्रमातील लोकांसोबत दिसत आहे. यासोबतच लोक'बाबा निराला'च्या नावाने घोषणाबाजी करताना दिसत आहेत. सध्या हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉबीने इन्स्टाग्रामवर टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये, 'आता प्रतीक्षा संपली... पुन्हा सुरू होणार आश्रमचे द्वार... जपनाम...' एवढंच नाही तर 'आश्रम 3' सीरिजचं ट्रेलर शुक्रवारी Mxplayer वर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सीरिजच्या तिसऱ्या भागात काय रोमांच असणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)


आश्रम वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची अशी भूमिका साकारली, की तो लोकांच्या मनात घर करून गेली. या वेब सिरीजची कथा काशीपूर या काल्पनिक शहरावर आधारित आहे. 


बाबा लोकांना आश्रमाशी जोडण्यासाठी कसे प्रवृत्त करतात हे वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेब सिरीजची कथा ड्रग्ज, बलात्कार आणि राजकारणाभोवती फिरते. प्रकाश झा यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.