`वयाच्या १८ व्या वर्षी अध्यात्मिक गुरुंनी असंकाही केलं की...`
`पद्मावत` फेम लोकप्रिय अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा
मुंबई : कलाविश्वात sanjay leela bhansali संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' padmavat या चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री अनुप्रिया गोएंका anupriya goenka आता 'आश्रम' aashram या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजच्या निमित्तानं तिनं अध्यात्मिक गुरुंबाबतचा आपला एक अनुभवही सर्वांपुढं आणला आहे. मुख्य म्हणजे तिचा हा अनुभव फारसा चांगला नाही हीच बाब यातून समोर आली आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत अनुप्रियानं तिच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाची माहिती दिली. तो एक असा प्रसंग होता, ज्याचा अनुप्रियाच्या मनावर वाईट परिणाम झाला होता. या मुलाखतीत ती म्हणाली, 'माझे वडील फारच अध्यात्मिक आहेत. या बाबतीत त्यांचे आणि माझे विचार वेगवेगळे आहेत'. आपल्या मते देवाचं अस्तित्वं आहे कारण, ही भावना सर्वांना दिलासा देणारी असते. पण, माझ्यासाठी अध्यात्मिकतेचा अर्थ असा होतो, की जीवनात एखादं चांगलं काम करणं.
अध्यात्मिकतेमुळं झाली अडचण....
आपल्या वडिलांसाठी अध्यात्मिकतेच्या संकल्पना अतिशय वेगळ्या असल्यामुळं साधू, साध्वी, त्यांच्याप्रती असणाऱी आस्था या साऱ्यामुळं आपल्या कुटुंबाला काही अडचणींचाही सामना करावा लागल्याचं अनुप्रियानं सांगितलं. अध्यात्मिकतेवर संपूर्ण लक्ष असल्यामुळं अनेकदा वडिलांचं जबाबदारी आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं. एक वडील, पती अशा जबाबदाऱ्यांपासून ते दुरावत असल्याचं लक्षात आलं. ज्याचे थेट परिणाम कुटुंबापुढं येणाऱ्या अडचणींच्या रुपात झाल्याचं तिनं सांगितलं.
अध्यात्मिक गुरुंचा वाईट मनसुबा
आपल्याला एका अध्यात्मिक गुरुंचा वाईट अनुभवही आल्याचा खळबळजनक खुलासा अनुप्रियानं केला. ज्या गुरुंवर आपल्या कुटुंबाचा विश्वास होता, त्याच गुरुंबाबतचा वाईट अनुभव आला, कारण त्यांनी माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा माझं वय फार कमी होतं असं अनुप्रियानं सांगितलं.
'तो फार व्यावहारिक बोलायचा त्यामुळं मी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. माझ्या कुटुंबाचाही त्याच्यावर विश्वास होता. पण मी १७-१८ वर्षांची होताच त्यानं माझा फायदा घेण्यास सुरुवात केली. मला ही बाब वारंवार भेडसावत होती. पण, वेळीच लक्षात आल्यामुळं मी त्या परिस्थितीतून स्वत:ला वाचवू शकले. पण मला एका विचित्र परिस्थितीचा प्रदीर्घ काळासाठी सामना करावा लागला होता. मीच त्याच्यावर विश्वास ठेवू लागल्यामुळं हे सारं घडल्यानंतर मला माझील शंका येऊ लागली. हा माझ्या जीवनातील एक अत्यंत वाईट प्रसंग होता', असं ती म्हणाली.