आशुतोष गोवारीकर घेऊन येत आहेत पानिपत...
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर एक नवीन ऐतिहासिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नवी दिल्ली : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर एक नवीन ऐतिहासिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन वर्षांपूर्वी आलेला त्यांचा मोहंनजो दारो हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसे चांगले प्रदर्शन करु शकला नाही. मात्र पुन्हा सर्व ताकदीनीशी आशुतोष नवा पानीपत हा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचा पहिला लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला.
पहिले पोस्टर आले समोर
लगान, जोधा अकबर, स्वदेस यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शक आशुतोष आता पानिपत सिनेमावर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत. यात संजय दत्त, अर्जुन कपूर, कृति सेनन हे कलाकार आहेत. हे पोस्टर शेअर करत आशुतोष यांनी लिहिले की, इतिहासातील कथा मला नेहमीच आकर्षित करतात. यंदा ही कथा पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची आहे. हे आहे पहिले पोस्टर.
अर्जुन कपूरच मराठा योद्धा
या प्रकारच्या ऐतिहासिक सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल अर्जुन आणि कृति यांनी आनंद व्यक्त केला. आता या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. हा सिनेमा ६ डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होईल. अर्जुन कपूरचा हा पहिला ऐतिहासिक सिनेमा असेल. यात तो एका मराठा योद्धाच्या भूमिकेत दिसेल.