मुंबई : अभिनेता रणबीर सिंगच्या न्यूड फोटोशूटची सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहे. त्याच्या न्यूड फोटोशूटवर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याच्या न्यूड फोटोमुळे खळबळ माजली आहे. कायम विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असणाऱ्या रणवीरने  न्यूड फोटोशूट केल्यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. एवढंच नाही तर अनेक सेलिब्रिटींच्या न्यूड फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रणवीरचे न्यूड फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेता आसिम रियाझ (Asim Riaz)चे देखील न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असीमने स्वत:चा न्यूड फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा होणे निश्चितच आहे. आसीनच्या फोटोंवर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्याचे चाहते 'सुपर', 'फँटास्टिक', हॉटनेस अलर्ट फॉर फॅनगर्ल्स' अशा कमेंट करत आहेत. 


बहुतेक लोक त्याला रणवीर सिंगपासून प्रेरित झाल्याचं सांगत आहेत. एका चाहत्याने "रणवीर भैय्याने सगळ्यांना बिघडवले आहे...' असं लिहिलं आहे. सध्या आसीमच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे. 



सध्या व्हायरल होत असलेला असीम रियाझचा थ्रो-बॅक फोटो आहे. 2017 मध्ये त्याने हे फोटोशूट केलं होतं. आसीमने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. प्रत्येकजण त्याच्या फिट बॉडीचे कौतुक करत असतात. 


रणवीर सिंगवर टीका होत आहे
खरतर, रणवीरच्या वादग्रस्त फोटोशूटनंतर आता रणवीर सिंगवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. ज्याच्या आधारे रणवीर सिंग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. या फोटोशूटसाठी लोक त्याला खूप ट्रोल करत आहेत.