मुंबई : साधारणत: अभिनेते हे आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावत असतात, पण रणवीर सिंग हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या अदभूत स्टाईलसाठी देखील खूप चर्चेत असतो. बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगने त्यांच्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो.  नुकताच अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट अभिनेता रणवीर सिंग असेल तर तो हिट होईल असं म्हटलं जात होतं. आम्ही तुम्हाला सांगतो की अभिनेत्याची एक मुलाखत तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये अभिनेत्याने सांगितलं आहे की, त्याने त्याचे वर्जिनिटी कधी गमावली आहे.


2014 मध्ये एका मुलाखतीदरम्यान अभिनेता म्हणाला होता की, जेव्हा मी माझी वर्जिनिटी गमावली होती तेव्हा मी 12 वर्षांचा होतो. ज्या महिलेशी माझे शारीरिक संबंध होते ती माझ्यापेक्षा वयाने बरीच मोठी होती. असं रणवीर यावेळी म्हणाला


मी सगळंकाही खूप लवकर सुरू केलं सर्वकाही! माझ्या आयुष्यात सर्व काही वेळेच्या आधी घडलं आहे. ज्या स्त्रीशी माझे संबंध होते ती माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी होती. रणवीरने सांगितलं की, मी त्या बाईने सांगितल्याप्रमाणे वागायचो कारण मी लहान होतो आणि मला समजत नव्हतं. ती माझ्यावर येऊन शारिरीक संबध ठेवायची. असं अभिनेत्याने सांगितलं. अशा स्थितीत त्या महिलेचे माझ्यासोबत ३ दिवस संबंध होते. ती महिला म्हणायची की तुला मजा आली असेल तर लवकर घरी ये.  असं अभिनेत्याने त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलं.


तसंच पुढे अभिनेता म्हणाला की,  लोकं मला घाणेरडं समजायचे. माझ्या शाळेतल्या मुलांच्या आई  म्हणायच्या या मुलापासून दूर राहा, हे एक सडलेलं फळ आहे जे सर्व मुलांना बिघडवत आहे. माझ्या आजूबाजूच्या सर्व मुलांना मी ज्ञान द्यायचो.  आणि मी तज्ञ झालो होतो कारण मी सगळंच खूप आधी  सुरू केलं होतं.


आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार
रणवीर सिंग आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे.  2010 मध्ये रणवीरने यशराज फिल्म्सच्या 'बँड बाजा बारात' सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं आणि एका रात्रीत तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपीका पदूकोणशी लग्न करुन रणवीरने संसारही थाटला आहे.