मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आज त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. विशेषत: त्याच्या डान्सने लाखो चाहत्यांना वेड लावलं आहे. हृतिक कायमच त्याच्या प्रोफेशनल लाईफ इतकाच त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. 8 जानेवारीला त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वडील राकेश रोशनसोबतचा एक फोटो शेअर केला.   एवढंच नव्हेतर  त्यांना पहिल्या स्टेजच्या घशाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचं उघड केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापुर्वी राकेश रोशन यांची लेक सुनैना रोशनदेखील कॅन्सर रुग्ण होती. सुनैनाला सर्वाइकल कॅन्सरसोबत अजून सहा आजारांनी ती ग्रस्त होती. डायबिटीज, फॅटी लीवर, हाइपरटेंशन, स्लीप एपनिया, कार्डिएक याच बरोबर तिला दोन पाऊलं चालल्यावर तिला श्वास घेण्यास त्रास व्हायचा. याचबरोबर वयाच्या २१ व्या वर्षी हृतिकला स्कोलियोसिसचा त्रास सुरु झाला होता.


स्कोलियोसिस आणि क्रॉनिक सबड्यूरल हेमाटोमा झाला होचा हृतिकला
हृतिक रोशन लहानपणी अडखळत बोलायचा. वयाच्या २१ व्या वर्षी तो स्कोलियोसिसने पिडीत होता. ज्याने त्याचा पाठीचा कणा इंग्रजी शब्द 'S' सारखा दिसू लागला.  डॉक्टरने असंही सांगितलं की, तो ना यापुढे डान्स करु शकत ना एक्टिंग करु शकत.


एवढंच नव्हेतर जोधा अकबर सिनेमाच्या शूटिंग दरम्यान गुडघेदुखीमुळे त्याला डॉक्टरने सांगितलं होतं की, तो यापुढे कधी उभाही राहू शकणार नाही. मात्र हृतिकने या आजारालाही हरवलं.  अग्निपथच्या शूटिंग दरम्यान त्याला स्लिप डिस्कचं निदान झालं. बँग बँग सिनेमाच्या शूटिंग दरम्यान  क्रॉनिक सबड्यूरल हेमाटोमा (ब्रेन च्या खालच्या बाजूने क्लॉटिंग) झालं. ज्यामुळे त्यानंतर त्याची सर्जरी झाली


 स्कोलियोसिस हा एक असा आजार आहे. ज्यामुळे दोन्ही बाजूच्या मणक्याच्या हाडांमध्ये एक असामान्य कल किंवा कर्व येतो. बऱ्याचदा यामगाचं कारम समजत नाही की, हा आजार कशामुळे होतो.  जर एखाद्या व्यक्तीच्या मणक्याची वक्रता किंवा झुकाव 10 अंशांपेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ असा होतो की त्याला स्कोलियोसिस आहे.  मणक्यामध्ये जास्त वक्रता असल्यास, त्यामुळे छातीतील जागाही कमी होते आणि फुफ्फुसांच्या योग्य कार्यामध्ये समस्या निर्माण होतो याचबरोबर श्वास घेण्यासही त्रास होतो.