Vanitha Vijaykumar : तमिळ चित्रपटसृष्टीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. अभिनेत्री वनिता विजयकुमार हिने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ती आता चौथ्यांदा लग्न करणार आहे. वनिता कोरिओग्राफर रॉबर्टसोबत 5 ऑक्टोबरला लग्न करणार आहे. वनिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रॉबर्टला प्रपोज करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती गुडघ्यावर बसून त्याला प्रपोज करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोमध्ये दोघेही पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरीमध्ये एक कॅप्शन देखील दिलं आहे. ज्यामध्ये तिने चाहत्यांना लग्नाचे आमंत्रण दिलं आहे. 5 ऑक्टोबर रोजी ते लग्न करणार आहेत. यासोबतच वनिता विजयकुमारने हार्ट इमोजी तयार केली आहे. 



वनिता विजयकुमारला दोन मुले


रॉबर्ट राज हा एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. याशिवाय बिग बॉस तमिळच्या सीझन 6 मध्ये देखील तो दिसला होता. वनिता ही ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांची मुलगी आणि अरुण विजय यांची सावत्र बहिण आहे. वनिताने 2000 मध्ये अभिनेता आकाशशी पहिले लग्न केले. तिला दोन मुले आहेत. त्यानंतर तिने 2005 मध्ये वेगळा होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढा लढला. मात्र, त्यांचा मुलगा सध्या वडील आणि आजोबांसोबत राहतो. 


त्यानंतर 2007 मध्ये तिने आनंद जय राजनशी लग्न केले. या जोडप्याला एक मुलगी आहे. 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि राजनला त्यांच्या मुलीचा ताबा मिळाला. नंतर वनिताने दावा केला की, कौटुंबिक कलहामुळे त्यांचे नाते बिघडले. यानंतर वनिताने पीटर पॉल नावाच्या फोटोग्राफरशी लग्न केले. जो आधीच विवाहित होता आणि त्याला मुले देखील होती. हे नाते 2020 मध्ये परस्पर संमतीने संपुष्टात आले.