Neena Gupta Video : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जरी त्यांचं वय 64 वर्ष असलं तरिही त्या फॅशनच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना मात देतात. सोशल मीडियावरही नीना गुप्ता नेहमीच सक्रिय असतात. एका पेक्षा एक पोस्ट शेअर करुन माधुरी तिच्या चाहत्यांना हैराण करते. नीना यांना त्यांच्या वाढत्या वयाची अजिबात पर्वा नाही. त्या नेहमीच बोल्ड ड्रेसमध्ये दिसतात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच नीना गुप्ता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नीना यांनी बोल्ड ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओत नीना यांचा सिझलिंग अवतार पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.  नीना गुप्ता यांचा हा बोल्ड लूक पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. एकीकडे त्यांचा बोल्ड लूक पाहून चाहते त्यांचं कौतुक करताना थकत नाहीयेत. तर अनेकजण तिला ट्रोलही करत आहेत. 


नीना गुप्ता यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
64 वर्षीय अभिनेत्री नीना गुप्ता या व्हिडिओमध्ये मस्ती आणि धमाल करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. सध्या नीना गुप्ता यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नीना यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट ड्रेस परिधान केला आहे.


नीना गुप्ता यांनी ही पोस्ट शेअर करत लिहिलं की, Ya jal bhun lo…ya love me…The choice. व्हिडिओमध्ये नीना गुप्ता यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. या फोटोत त्या सोफ्यावर बसलेल्या दिसत आहेत. नीना गुप्ता यांना बोल्ड अवतारात पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी अश्लिल कमेंट करत या अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. अनेकांनी त्यांना त्यांच्या वयाचा विचार करण्याचा सल्लाही दिला आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, ती बहुधा तिचं वय विसरली आहे. वयाचा विचार करा. तर अजून एकाने लिहिलं आहे की, तुम्ही शर्टच्या खाली काहीतरी घालायला हवं होतं. मात्र, अभिनेत्री या सगळ्या कमेंट्सकडे दुर्लेक्ष केलं आहे.