`हिरामंडीच्या सेटवरील कलाकारांच्या वागणुकीमुळं मी नैराश्यात` ; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
संजय लीला भन्साळी यांच्या `हिरामंडी`ने ओटीटीवर चांगलीच कमाई केली. सिनेमातील प्रत्येक कलाकांरांच्या अभिनयाचं सर्वच स्तरावरुन कौतुक केलं जातं आहे. अशातच अभिनेता जेसन शाह याने `हिरामंडी`च्या सेटवर घडलेल्या धक्कादायक घटना मुलाखतीत सांगितल्या.
भारतीय सिनेसृष्टीत संजय लीला भन्साळी हे नाव आदराने घेतलं. बॉलिवूड, साऊथ आणि मराठी सिनेमा विश्वातील प्रत्येक कालाकारांचं संजय भन्साळींसोबत काम करण्याच स्वप्नं असतं. 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास' पासून ते आता प्रदर्शित झालेल्या हिरामंडी' आणि 'गंगूबाई काठियावाडी' यांसारख्या सिनेमांनी बॉक्सऑफिसवर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलीच कमाई केली. नुकतंच रिलीज झालेल्या हिरामंडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली.
पाकीस्तानातील सत्य घटनेवर आधारीत 'हिरामंडी' सिरीजमधले सर्वच कलाकार चर्चेत आले आहेत. मात्र आता या सीरिजमधले कलाकार वेगळ्या बाबतीत चर्चेत येत आहेत. या सीरिजमधून खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता जेसन शाहने दिलेल्या मुलाखतीत त्याने शुटींग दरम्यान घडणारे किस्से सांगितले. जेसन म्हणतो, 'हिरामंडी'च्या सेटवर भितीचं वातावरण असायचं. ऑनस्क्रीन काम करताना तुमचं तुमच्या सहकालाकारांशी केमिस्ट्री जुळणं फार महत्त्वाचं असतं. जे मला 'हिरामंडी'च्या सेटवर दिसलं नाही. असं जेसनने सांगितलं. त्याशिवाय संजय भन्साळी आणि इतर कलाकारांशी मोकळेपणाने बोलणं कधी जमलंच नाही. मोठ्या बॅनरखाली काम करण्याच्या आनंदापेक्षा मला सेटवरच्या कलाकारांच्या वागणुकीचा कायमच त्रास झाला. सेटवरच्या कलाकारांनी कायमच मला वेगळं ठेवलं. असं जेसनने त्याच्या मुलाखतीत सांगीतलं.
'हिरामंडी'च्या सेटवर कायमच भीतीचं वातावरण असायचं. इतर सहकलाकार कधी स्वत: हून बोलायलाही येत नव्हते. त्यामुळे मी सेटवर एकटाच असायचो. सुरुवातीला वाटलं की, माझी भूमिका खलनायकाची असल्याने असं होत असावं. पण हळूहळू मला या सगळ्याचा अंदाज येऊ लागला. त्यामुळे मी माझ्या कमावर याचा परिणाम होऊ द्यायचा नाही असं ठरवलं. सेटवर मिळालेल्या वागणूकीने मला अनेकदा मानसिक नैराश्य देखील आलं, पण मी माझ्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत केलं. हिरामंडीच्या सेटवर कायमच मला ज्युनिअर आर्टीस्ट म्हणून अपमानास्पद वागणूक मिळाली. सेटवर भन्साळींशी कधी बोलणं झालं नाही. फार फार तर सीनबद्दल थोडक्यात बोलणं होत असायचं', असं तो म्हणाला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.