मुंबई : क्रिकेटपटू केएल राहुल बॉलिवूड अभिनेत्री आणि सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीला डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. केएल राहुल आणि अथियासोबतचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अथिया आणि केएल राहूलच्या अफेअरच्या चर्चा रंगताचं दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न चाहते सतत दोघांना विचारत आहेत. आता चाहत्यांना लवकरचं अथिया आणि केएल राहूलच्या लग्नाबद्दल माहिती मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल येत्या तीन महिन्यांत मुंबईत लग्न करणार असल्याचं समोर येत आहे. 


त्याचबरोबर दोघांनी मुंबईत घर देखील घेतले आहे, जिथे ते लग्नानंतर राहणार असल्याच देखील समोर येत आहेत. सध्या त्यांच्या घराचं काम सुरू आहे. त्याचबरोबर अथिया स्वतः लग्नाच्या तयारीच्या कामाला लागली आहे. मात्र, दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. 



दरम्यान, अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या नात्याबद्दल सर्वांना कळाल्यानंतर अनेकदा दोघे एकत्र स्पॉट झाले. एवढचं नाही तर, अथिया शेट्टी बॉयफ्रेंड केएल राहुलसोबत तिचा भाऊ अहान शेट्टीच्या 'तडप' सिनेमाच्या स्क्रिनिंगला आली होती.


सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान एकत्र अथिया आणि केएल राहूलला एकत्र पाहिल्यानंतर रंगणाऱ्या चर्चांनी जोर धरला. आता अथिया आणि केएल राहूल कधी लग्न करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागल आहे.