केएल राहुल आणि अथिया शेट्टी `या` महिन्यात अडकणार विवाह बंधनात!
सुनिल शेट्टीच्या लेकीला लगीन घाई..., शेट्टी कुटुंबात वाजणार सनई चौघडे...?
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नानंतर सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगत आहे. क्रिकेटपटू केएल राहुल आणि अथिया शेट्टीला डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. अफेअरच्या चर्चा रंगताचं दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न चाहते सतत दोघांना विचारत आहेत. आता चाहत्यांना लवकरचं अथिया आणि केएल राहूलच्या लग्नाबद्दल माहिती मिळणार आहे.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल पुढच्या वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात सप्तपदी घेणार असल्याचं सांगितल जात आहे. पण जर कुटुंबाने लग्नासाठी पुढची तारीख ढकलली, तर चाहत्यांना केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पण दोघांच्या कुटुंबाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. म्हणून अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाबद्दल ज्या चर्चा रंगत आहेत, त्यामधील सत्य येत्या काळातचं समोर येईल.
दरम्यान, अभिनेता सुनिल शेट्टीने 'अद्याप लग्नाची कोणतीही तयारी सुरू नाही. तीन महिन्यात अथियाचं होणार नाही...' अशी प्रतिक्रिया दिली होती. पण आता पुन्हा केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे अथिया आणि केएल राहूल कधी लग्न करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागल आहे.