राहा आणि आतिफ असलमची लेक दिसते Same to Same! फोटो पाहून नेटकरी हैराण
Raha and Atif Aslam`s Daughter looks same : आतिफ असलमची लेक आणि रणबीर कपूरची लेक दिसतात एकसारख्या...
Raha and Atif Aslam's Daughter looks same : पाकिस्तानी लोकप्रिय गायक आतिफ असलमनं त्याच्या 1 वर्षाच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात पहिल्यांदा त्यानं त्याच्या लेकीचा चेहरा दाखवला आहे. त्याच्या मुलीचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतिफ असलमची लेक ही रणबीर आणि आलियाची लेक राहासारखी दिसते. दोघांच्या चेहऱ्यात फार साम्य आहे.
आतिफ असलमनं त्याच्या लेकीची फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तर त्याच्या मुलीचे नाव हालिमा असे आहे. गेल्यावर्षी आतिफ वडील झाला आणि तेव्हा पासून त्याच्या चाहत्यांना त्याच्या लेकीचे फोटो पाहायचे होते. तिची एक झलक पाहण्यासाठी सगळे आतुर झाले होते. आता जेव्हा काल 23 मार्च रोजी हालिमा एक वर्षाची झाली. त्यानिमित्तानं आतिफनं तिच्या पहिल्या वाढदिवसा निमित्तानं चाहत्यांना तिचा चेहरा दाखवला. आतिफनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यानं हालिमाचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तो आणि हालिमा दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत हालिमा सोफ्यावर उभी असल्याचे दिसते. वर्षभराची असूनही ती कॅमेऱ्या समोर पोज देते. तर या फोटोत ती अगदी राहासारखी दिसत आहे.
हालिमाचे फोटो शेअर करत आतिफनं कॅप्शन दिलं की बाबानं, "त्याच्या प्रिन्सेसचे बूट हे त्याच्या खिशात लपवून ठेवले आहेत. जेव्हा हालिमाला हवे असतील तेव्हा फक्त मला सांगा. खूप खूप प्रेम. वाढदिवसाच्या शुभेच्छा 23/03/23"
हेही वाचा : 'मला 15 वेळा कॉल करण्याची गरज नाही...', लग्नानंतर रकुलनं केलं जॅकीसोबतच्या नात्यावर वक्तव्य
काही नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट करत राहाची आठवण येत असल्याचे सांगितलं. आतिफनं हालिमाचे फोटो शेअर करताच इन्स्टाग्रामवर याच गोष्टीवर चर्चा सुरु झाली की ती राहासारखी दिसते. हालिमाची क्यूटनेस आणि तिच्यात असलेल्या गोडव्याची स्तुती करत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं 14 एप्रिल 2022 ला लग्न केलं आणि 6 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांची लेक राहाचा जन्म झाला. क्रिसमस 2023 च्या निमित्तानं आलिया आणि रणबीरनं राहाचा चेहरा दाखवला. राहाचा फोटो पाहताच सगळे तिच्या प्रेमात पडले. राहाचे फोटो सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. राहा ही राज कपूर यांच्यासारखी दिसते असे देखील अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.