Atif Aslam tribute for Lata Mangeshkar : भारतीय संगीत विश्वातील एक मोठं नाव म्हणजे दिवंगत गायिका लता मंगेशकर. फक्त भारत देश नव्हे तर संपूर्ण जग त्यांच्या आवाज ऐकून मंत्रमुग्ध व्हायचे. तब्बल 6 दशकं लता मंगेशकर यांनी अधिराज्य गाजवलं. आपल्या समुधूर आवाजाने त्यांनी अनेक गाणी अजरामर केली. आजही त्यांचा आवाज कानावर पडताच मंत्रमुग्ध व्हायला होतं. आजही अनेक गायक लतादीदींना आपले गुरु मानतात. आता अलीकडेच एका पाकिस्तानी गायकाने लता मंगेशकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम याचा अबू धाबीमध्ये गाण्याचा एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये त्याने 'एक प्यार का नगमा' हे गाणं गायलं. त्यावेळी त्याने लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवरील फिल्मज्ञान या पेजवर याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 


या व्हिडीओत अतिफ अस्लम हा पांढऱ्या रंगाचे शर्ट परिधान करुन गाताना दिसत आहे. यावेळी तो लता मंगेशकर यांचे सुपरहिट एक प्यार का नगमा हे गाणे गाताना दिसत आहे. यावेळी त्याच्या मागे असलेल्या स्क्रीनवर लता मंगेशकरांचा एक फोटो दिसतो. त्यासोबत लता मंगेशकर 1929-2022 असे लिहिले असल्याचे दिसत आहे. आतिफ अस्लम यांनी अनोख्या अंदाजात लता मंगेशकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या या अंदाजाचे प्रेक्षकही कौतुक करताना दिसत आहेत.  



लवकरच मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण


दरम्यान पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमने बॉलिवूडला त्याच्या सदाबहार गाण्यांनी मंत्रमुग्ध केले. हिंदी सिनेसृष्टीत त्याने गायलेली गाणी हिट ठरली आहेत. अतिफ अस्लमची ओळख जरी पाकिस्तानी गायक असली तरी भारतामध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्याच्या आवाजाचे अनेक लोक चाहते आहेत. अतिफने 2005 मधील 'जहर' चित्रपटातील 'वो लम्हे वो बाते' हे गाणं गायलं होतं. यानंतर त्याने 'दिल दिया गलां', 'जीने लगा हूं', 'जीना जीना', 'बाखुदा तुम्ही हो', 'अल्ला दुहाई है' यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली. आता लवकरच अतिफ अस्लम हा लवकरच मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.