Ratris Khel Chale : अखेर शेवंताची एण्ट्री होणार, अण्णांइतक्याच घायाळ अंदाजात शेवंता
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा भाग सुरू आहे. या भागात अण्णांची तर एण्ट्री झाली, पण रात्रीस खेळ चालेमधून घराघरात पोहोचलेली आणि चाहत्यांच्या मनावर जादू करणारी शेवंता मात्र दिसत नव्हती. रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णा जेवढे फेमस झाले, तितकीच शेवंताही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली.
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा भाग सुरू आहे. या भागात अण्णांची तर एण्ट्री झाली, पण रात्रीस खेळ चालेमधून घराघरात पोहोचलेली आणि चाहत्यांच्या मनावर जादू करणारी शेवंता मात्र दिसत नव्हती. रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णा जेवढे फेमस झाले, तितकीच शेवंताही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली.
मात्र आता प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण लवकरच अपूर्वा नेमळेकर म्हणजेच शेवंता रात्रीस खेळ चालेच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. झी मराठीनेच यासंदर्भात माहिती देत प्रेक्षकांची आतुरता शिगेस नेली आहे.
शेवंता येणार पण कधी ते जाणून घेण्यासाठी फोनचा brightness वाढवा असं कॅप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे आता नेमकी कोणत्या एपिसोडमध्ये शेवंता दिसणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनचा ब्राईटनेस वाढवावा लागेल. फोनचा ब्राईटनेस वाढवलात, की तुम्हाला कळेल, शेवंता रात्रीस खेळ चालेमध्ये कधी एण्ट्री घेणार आहे.