मुंबई : तरूणांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध गायक गुरू रंधावावर कॅनडा येथील वेंकुवर येथे एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. आता त्याची परिस्थिती स्थिर असल्याचे कळत आहे. या गोष्टीची माहिती खुद्द गुरूचा जवळचा मित्र आणि पंजाबी गायक प्रीत हरपालने फेसबूकच्या माध्यमातून दिली आहे. फेसबूकवर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. 'गुरू हा खूप चांगला व्यक्ती आहे. मी गुरूला खूप आधी पासून ओळखतो. तो नेहमी इतर लोकांचा आदर करतो.' अशी भावूक पोस्ट प्रीत हरपालने लिहिली आहे.