मुंबई : कोरोनाचे संकट असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे बॉलिवूड फिल्म, मराठी सिनेमांसह मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे कोट्यवधींचे फिल्म सिटीचे नुकसान होत आहे. छोट्या पडद्यावरील मालिकाही बंद आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे जवळपास दोन महिन्यांपासून चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे टिव्हीवर जुन्या मालिका प्रसारित करण्यात ये आहे. लॉगडाऊन-३ जाहीर झाले तरी काही भागात सूट देण्यात आली आहे. ग्रीन झोनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे मालिकांचे बंद असलेले हे चित्रीकरण आता सुरु करण्याची तयारी काही वाहिन्या आणि निर्मात्यांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट आणि टीव्ही उद्योग कोरोनाव्हायरसच्या संकटापासून कसा सावरणार याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता ग्रीन झोनमध्ये चित्रीकरण सुरु करता येईल का, याची चाचपणी सध्या करण्यात येत आहे. त्यामुळे चित्रीकरणाशी निगडीत सर्वांना वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र रेड झोनमध्ये अडकलेले कलाकार आणि इतरांना बाहेर काढण्याची मोठी समस्या निर्मात्यांसमोर आहे. त्यामुळे कमीत कमी कलाकार, लोकांमध्ये आणि नियमांचे पालन करुन कशाप्रकारे चित्रीकरण करता येईल यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न निर्मात्यांनी सुरु केल्याचे समजते आहे. 


संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे.  लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवहार, वाहतूक, चित्रपट-मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान आता 'झी मराठी'वरील प्रसिद्ध मालिका पुन्हा एकदा दाखविण्यात येत आहेत. 'तुला पाहते रे', 'स्वराज्य रक्षक संभाजी' आणि 'जय मल्हार' या तीन मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या आहेत. 


'तुला पाहते रे' ही मालिका ६ एप्रिलपासून सुरु करण्यात आली आहे तर गाजलेली 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका सायंकाळी ४ वाजता दाखविण्यात येत आहे. तसेच तर संध्याकाळी सहा वाजता 'जय मल्हार' मालिका दाखविण्यात येत आहे. जवळपास सर्वच मालिका बंद असल्याने प्रेक्षकांकडून या जुन्या मालिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.