मुंबई : लाईफ ओकेवरील लोकप्रिय सीरियल 'भाभीजी घर पर हैं'च्या अनिता भाभी म्हणजेच सौम्या टंडन यांना इस्तांबुलमध्ये लूटलं आहे. सौम्या ही मागील काही दिवसांपूर्वी इस्तांबुलमध्ये वॅकेशन इन्जॉय करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका टॅक्सी ड्रायवरने त्यांचे 1000 यूरो लूटले. त्यानंतर सौम्याने पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. सौम्याने मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सी ड्रायवरने मला म्हटलं की मला प्रार्थनेसाठी उशीर होत आहे आणि तो माझ्यावर ओरडू लागला. मी माझा पर्समध्ये सुट्टे पैसे बघत होती. टॅक्सी रस्त्याच्या मध्येच उभी केली होती. टॅक्सीचा मीटर देखील चालू नव्हता केला.


जेव्हा मी पैसे दिले तर तो बोलला हे चुकीचे पैसे आहेत. टर्कीमध्ये यूरो आणि लीरा दोन्ही करंसी चालतात. मला वाटलं त्याला युरो पाहिजे मी युरो देण्यासाठी पर्स उघडली तर त्याने जबरदस्ती माझा पर्समध्ये हात टाकून पैसे काढले. तो जोरजोरात ओरडत होता आणि हॉर्न वाजवत होता त्यामुळे माझं लक्ष विचलीत झालं. तो जेव्हा तेथून निघून गेला तेव्हा मी माझ्या पर्समध्ये पाहिलं तर पर्समधून १००० यूरो गायब होते.