नवी दिल्ली : २००९ साली हॉलीवूडची थ्री डी फिल्म अवतारने रेकॉर्डतोड कमाई केली होती. २.८ अब्ज डॉलर कमवणाऱ्या या सिनेमाचा सिक्वेलही येणार अशी चर्चा तेव्हा रंगली होती. आता जवळजवळ आठ वर्षांनंतर, त्याच्या सिक्वेल वर काम सुरु आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे,आणि या थ्रीडी मूव्हीचे बजेट एक अब्जापेक्षा जास्त डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेम्स कॅमरन एकाच वेळी 'अवतार' चे चार भाग शूट करणार आहेत. यापूर्वी पीटर जॅक्सनने 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' च्या तीन भाग एकावेळी शुट केले होते.



जेम्स कॅमेरॉन हे भव्य चित्रपट तयार करण्यासाठी ओळखले जाते. जेम्स कॅमेरॉनने यापूर्वी टर्मिनेटर २ आणि टायटॅनिकसारखे चित्रपट बनवले आहेत. अवतारचा दुसरा भाग १८ डिसेंबरला २०२० रोजी तर त्यानंतर एक वर्षाने त्यापुढचा भाग दाखविला जाणार आहे. उर्वरित दोन भाग २०२४ आणि डिसेंबर २०२५ मध्ये दाखविले जातील. जेम्स कॅमेरॉन चित्रपटातून भव्यदिव्य करणार असल्याची आशा केली जात आहे.