मुंबई : भारतीय बॉक्स ऑफिसवर रिलीज होणाऱ्या सगळ्या विदेशी चित्रपटांना मागे टाकत हॉलीवूड सिनेमा अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर या सिनेमाने एका आठवड्यात १५० कोटींची कमाई केलीये. गेल्या १० वर्षात हॉलीवूडने अनेक सुपरहिरोज दिलेय. यातील १९ सुपरहिरोजना घेऊन मार्व्हल कॉमिक्सने एक सिनेमा बनवलाय. हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच याची क्रेझ लोकांमध्ये होती. अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरने बॉक्स ऑफिसवर एका आठवड्यात १५० कोटींहून अधिक कमाई केलीये. दरम्यान, अद्याप अंतिम आकडा येणे बाकी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी या सिनेमाने ११ कोटी ७५ लाख रुपयांचे कलेक्शन केलेय. मात्र पाच दिवसांमध्ये दर दिवसाला २० कोटीहून अधिक कमाई करण्याच्या वेगाला ब्रेक लागला. अँथनी आणि जो रुसो यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेय. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात आला. 


अशी होती अॅव्हेंजर्सची कमाई


पहिला दिवस - शुक्रवार ३१.३० कोटी रुपये
दुसरा दिवस - शनिवार - ३०.५० कोटी रुपये
तिसरा दिवस - रविवार - ३२.५० कोटी रुपये
चौथा दिवस - सोमवार - २०.५२ कोटी रुपये
पाचवा दिवस - मंगळवार - २०.३४ कोटी रुपये
सहावा दिवस - बुधवार - ११.७५ कोटी रुपये
सातवा दिवस - गुरुवार - ९.७३ कोटी रुपये


आतापर्यंत जगभरात तब्बल ९०० मिलियन डॉलरहून अधिक कमाई करणारा अॅव्हेंजर्स शुक्रवारच्या कलेक्शनसह एक बिलियनचा आकडा गाठू शकतो.