मुंबई : राजकारणाची हवा चित्रपटसुष्टीलाही मध्येच ऋुतू बदलल्यासारखी लागत असते, वक्तव्यांच्या या प्रदुषणात कुणाला हवा बाधते, तर कुणाला मानवते. पण वक्तव्याची ही हवा कुणाला कुठे खुपेल आणि कुठ दुखेल हे सांगता येत नाही. अभिनेत्री कंगना राणावत ही भारतीय स्वातंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता वक्तव्याचे हवाबाण सोडणे सुरु झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी २०१४ मध्ये सत्तेत आले तेव्हा वास्तविक स्वातंत्र्य मिळालं, त्या आधी १९४७ साली मिळालेलं स्वांतंत्र्य हे तर भिक दिल्यासारखं होतं, असं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केलं होतं.


ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अभिनेत्री कंगना राणावत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याशी आपण सहमत असल्याचं म्हटलं होतं. विक्रम गोखले यांनी दाखवलेल्या या सहमतीला गायक आणि संगीतकार अवधुत गुप्ते यांनी पाठिंबा दिला आहे. 


अवधुत गुप्ते यांनी म्हटलं आहे, विक्रम गोखले हे एक मोठे कलाकार आहेत, तसेच ते जे काही बोलले असतील ते विचार करुनच बोलले असतील, असं अवधुत गुप्ते यांनी म्हटलं आहे.